9422514013 / 9822714667 / 9049948877 info@3pointadventures.com

२३ तारखेला जोर ते आर्थर-सीट हा ट्रेक १४ डोंगरवेड्यां बरोबर केला. जंगलाच जंगलीपण ह्या अश्याच ट्रेक मधे अनुभवायला मिळत. तसा वासोटा पण आहे पण जोर ते आर्थर-सीट पर्यंतची वाट मळलेली नसल्या मुळे मनुष्यप्राण्याचा इथे फारसा वावर नाही. कुंभळजाई मंदिरा पासुन गावात शिरलो. गावात रामराम शामशाम करून जंगलाची वाट धरली. अश्या जंगलात गेल्यावर नवख्या trekker चे घ्राणेंद्रिय सुद्धा तीक्ष्ण होतात.

२, ३ तासांच्या चाली नंतर घुमटी पाशी पोचलो. गावातुन घेतलेल्या स्वयंपाकावर ताव मारून थोडी विश्रांती घेऊन परत चालायला सुरवात केली. Rock Patch वरून चढताना पायांची झालेली ‘गिटार’आणि पोटात उठलेला गोळा पुढच्या ट्रेक ला सर्वांना नवा आत्मविश्वास देतील. आर्थर-सीट वरून, एखादया अजस्त्र पसरलेल्या अजगरा सारख्या सह्याद्री च रौद्रभीषण सौंदर्य पहात, मावळतीच ऊन अंगावर घेत आणि पुढल्या ट्रेक चा मनसुबा बनवत परतीचा प्रवास सुरु केला.
 

Thanks,
Surendra.