9422514013 / 9822714667 / 9049948877 info@3pointadventures.com

काल १६ July ला आम्ही शिवनेरी, हडसर, जीवधन आणि नाणेघाटा च्या चौकडीत ला, इतिहासात संपन्न असलेल्या जुन्नर बाजार पेठेचा संरक्षक चावंड ला भेटलो. जुन्नर म्हणजे आम्हा भटक्यांच नंदनवन. डोंगरांच्या पसाऱ्यात, भात खाचरात, चिखलातुन चालताना होणाऱ्या चुबुक चुबुक आवाजात, चिंब पावसात, भराट वाऱ्यात, ओढयात, झऱ्यात आणि like minded वेडया भटक्यांच्या सहवासात कालचा रविवार सत्कार्णी लागला. निसर्ग आपल्याला positive energy देतच असतो पण आपल्या आजुबाजुलापण अशी बरीच माणस असतात कि ती आपल्या नकळत आपल्याला positive करतात. ६ वर्षांचा पिल्लु शौर्य, कोणी ओळखीच बरोबर नसताना trek ला एकटा आलेला ओजस, खास trek साठी सांगलीवरून आलेले ७२ वर्षांचे दत्ता काका त्या category तले.

तासा भरात गड चढुन गडाला प्रदक्षिणा घातली. आपण गडाला प्रदक्षिणा घातली म्हणतो, किती समर्पक शब्द आहे हा. गडकिल्ल्यांच स्थान आपल्याला देवळां सारखाच आहे, पवित्र. कुकडेश्वर मंदिर बघीतल कि भानच हरपत. अशी अनेक सुंदर मंदिर आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. ती बघताना कळत कि देव देवळात नाही तर त्या कारागिरांच्या हातात आहे आणि बघणाऱ्या आपल्या डोळ्यात आहे.

फिरस्तीतुन आपण सहजच समृद्ध होतजातो आणि त्यामुळे मला काय नाही त्यापेक्षा मला काय मिळाल आहे त्याची list आपोआप मोठी होते. म्हणुनच सर्वार्थांनी असलेली आपली श्रीमंती अनुभवण्यासाठी वेळ मिळेल तेंव्हा पायांना चाक लाऊन घरा बाहेर सुटल पाहिजे.

– सुरेंद्र जालिहाळ.