9422514013 / 9822714667 / 9049948877 info@3pointadventures.com

May 06 –

६ मे ला राधिका, ख़ुशी, प्रीती मॅम आणि मी PNQ वरून DEL ला झेपावलो. दिल्ली ला आम्हाला सोमा मॅम जॉईन झाल्या. आता आमच विमान KTM च्या दिशेनी उडाल. बऱ्याच वेळ आकाशात घिरटया घालत बसल्या नंतर आम्ही खाली उतरलो, पण KTM ला नाही तर LKO त. Bad weather मुळे विमान Kathmandut उतरू शकल नाही. Refueling साठी आम्हाला लखनौ त उतराव लागल. आता विमानाचा प्रवास सुरु झाला ………… दिल्ली च्या दिशेनी, again bad weather. असा आमचा पहिला दिवस दिल्लीत येऊन संपला.

May 07 –

सकाळी गेलो तर आम्हा सर्व passengers ना hold वर ठेवल. ‘विमानात कोणी cancel झाल तर तुम्हाला priority दिली जाईल’ हे ऐकल आणि आमच हृदय तोंडातुन बाहेर पडायची वेळ आली. नशिबानी आम्हाला accommodate केल आणि आम्ही विमानात बसलो. ह्या सगळ्या रामायणात सगळ्यांच्या fingers cross झाल्या आणि त्या परत निघाल्या ते आम्ही KTM ला land झाल्यावरच. Kathmandut grand स्वागत झाल. किरकोळ खरेदी करून लवकर झोपलो कारण सकाळी लवकारच्या flight नि Lukla ला उडायच होत.

May 08 –

सकाळी लवकर Airport ला पोचलो. Tara ची विमान Lukla ला उडत होती पण आमच Goma काही उडायच नाव घेत नव्हत. Airport वर बसुन बसुन आमचे sleeping statue बनले. उलटणाऱ्या प्रत्येक तास बरोबर आमचे तोते उडायला लागले पण आमच Goma काही उडत नव्हत. शेवटी गणपती नि नाही तर शंभु नि खटपट करून Heli manage केलं. पहिल्या Heli मी साधारण ३.३० ला आणि नंतरच्या Heli नि बाकीची team ६.०० पर्यंत Lukla ला पोचली. Heli ride चा adventurous अनुभव सगळ्यांच्या डोळ्यातुन ओसंडत होता तर माझ्या पोटात सलग दोन दिवस वाया गेल्याचा गोळा उठत होता.

May 09 –

आज आम्ही पहिला मुक्काम Fakding ऐवजी Monjo (9,298 ft) ला करायच ठरवला. Fakding ला आमच पावसानी चिंब स्वागत केलं. Fakding ला जेवण करून आम्ही Monjo ला वस्तीला पोचलो. आज दिवसभरात आमची ५/६ तासांची वारी झाली.⁠⁠⁠

10 May –

सकाळी लवकर उठलो कारण आजचा पल्ला मोठा होता. आजचा दिवस आमचा चांगलाच घाम काढणार होता. तिबेट मधून येणारी भोटेकोशी आणि दुधकोषीच्या संगमावर जरा ब्रेक घेतला. फोटो-बिटो काढले आणि चालण्यासाठी gear टाकला. लहानपणी आपण सगळेजण एकदा तरी मोठी घसरगुंडी पायऱयांवरून चढण्या ऐवजी घसरगुंडीच्या बाजूने चढलेलो असतो. आजची Naamchechi चढाई काहीशी अशीच होती. आता आमची Duranto Exp. Zelam मध्ये convert झाली. श्वास आणि पावले यांचे ताळमेळ बसवण कठीण जात होत. आम्ही जस जस वरती जात होतो, तस तशी नदी छोट्याशा रेषेत रूपांतरित होत होती. सगळ्यात उंच आणि मोठा hanging bridge cross करण्याचा अनुभव विलक्षण होता. राधिका आणि खुशीचा FM Radio तात्पुरता बंद झाला होता. आता दोघी फक्त डोळ्यांनी बोलत होत्या. आता बास! थांबा! कधी येणार आहे नक्की Namche? यावर माझ standard उत्तर असायच, १/२ तास. शेवटच्या वळणावर अचानक Kung Fu Panda च्या गावासारख Namche समोर आवतरल. आम्ही पोहोचलो त्यादिवशी बुद्ध पौर्णिमा असल्याने पारंपारिक Namche पाहता आल. Yak Hotel मध्ये शंभूंनी बासरी वाजवून सर्वांनां refresh केल. उद्या आमच schedule निवांत होत. नावाला ?

11 May –

आज height gain करून Kumjum ला जेवायचा प्लॅन होता. आजचा Rest day पण खूप थकवणारा होता. पण आमच्या acclimatization च्या दृष्टीने गरजेचा पण होता. 2.30-3 तासाच्या चालीनंतर आम्ही Everest View Hotel वर पोहोचलो. इथून Everest च पहिल दर्शन expet होत. पण त्याची तशी इच्छा दिसत नव्हती. वातावरण प्रचंड cloudy होत. शेवटी दुधाची तहान ताकावर भागवत आम्ही Mt. Ama Dablam वर आमची तहान भागवली. Mt. Thamserku, Mt. Kusum Kangru, Mt. Ama Dablam, Mt. Lhotse हे आता आमचे नित्याचेच साथीदार झाले होते. या डोंगरांची भव्यता शब्दात मांडण कठीण. त्याची प्रत्यक्षात अनुभूतीच घ्यावी. हॉटेलपासून उतरणीला लागलो. जंगलातून चालताना जाम मजा येत होती. हि पायवाट आम्हाला Kumjum ला घेऊन आली. Sir Edmand Hillary नी या गावासाठी खूप काही केल. शाळा बांधल्या, hospital बांधली. Kumjum ला Daal-Bhaat with Vegie रेमटवून परत Namche चा रस्ता धरला. Syangboche वरून Namche त उतरताना वातावरण बदलल. कोणत्यातरी पौराणिक picture मधला स्वर्गाचा सेट लावल्यासारख वाटत होत.

12 May –

आजचा मुक्काम Tengboche ला होता. Namche च्या डोंगराला traverse मारून वाटेल लागलो. Fungi-Tangyala ला उतरताना Tengboche ची वाट दिसत होती. सगळा डोंगर rhododendron च्या फुलांनी बहरला होता. वाट एखाद्या अजस्त्र सापासारखी वाकडीतिकडी पसरली होती. Namche सारखा नसला तरी Tengboche चा चढपण चांगलाच थकवणारा होता. Tengboche ची bakery पाहून राधिका आणि ख़ुशी चा चेहरा जिभल्या चाटणाऱ्या emoji सारखा झाला. शरीर थकल्यावर झोपेची वाट पाहावी लागत नाही, गादीवर पडल्या पडल्या खुडूकलो.

13 May –

सकाळी Tengboche सोडल्यावर १५ मिनिटात Deboche च्या जंगलात आलो. जंगलातून चालण्याची मजाच काही वेगळी असते. योग्या सारखे बसलेले डोंगर, वाऱ्याचा, नदीचा आवाज, पानांची सळसळ जणु आपल्याशी बोलायचा प्रयत्न करतात. फक्त त्यांची भाषा आपल्याला समजायला हवी. Dengboche ला पोहोचेपर्यंत निसर्गचित्र बदलल होत. आता canvas वरून झाडांची हिरवाई गायब झाली होती, वारा त्याचा हळुवारपणा विसरून क्रूरपणे आमच्या त्वचेतुन हाडापर्यंत जाण्याचा प्रयत्न कारत होता. वाटेत एक नेपाळी काका सारंगीवर सुंदर नेपाळी गाण म्हणत होते. आम्हीपण गाण ऐकायला थांबलो. थोडी विश्रांती मिळाली, शरीराला नाही पण मनाला. Namche सारखाच Dengboche हा आमच्या trek चा महत्वाचा टप्पा होता.

14 May –

कालची रात्र जरा tension मध्ये गेली. सोमा मॅडमचा चेहरा चांगलाच सुजला होता. Nausea आणि headache तर सगळ्यांना common झाला होता. आजचा दिवस तसा निवांत होता. सकाळी सोमा मॅडमला खालीच ठेवून आम्ही सगळे शेजारच्या Nagakarsang टेकडी वर height gain साठी गेलो. टेकडीवरून सगळा नकाशा उलगडून ठेवावा अस clear दृष्य दिसत होत. समोरच Mt. Ama Dablam, Mt. Lhotse, Mt. Island, Mt. Taotse, Loboche peak एखाद्या सुमो पैलवानासारखे मांड ठोकून बसले होते. खाली डावीकडे Loboche ला घेऊन जाणारा रस्ता दिसत होता. तर दूर उजवीकडे Mt. Island च्या पायथ्याच Chukum हे गाव नजरेत भरत होत. आजच्या दिवसाचा अभ्यास संपवून आम्ही खाली उतरलो तर आम्हाला एक shock बसला. आम्ही pricaution म्हणून सोमा मॅडमला खाली पाठवण्याच्या बेतात होतो, आणि खाली येऊन बघतो तर त्या एकट्याच hieght gain साठी गेल्या होत्या. 1- 1.30 तासानंतर त्यांना पाहिल्यावर जीवात जीव आला. त्या आल्या ते एक नवी energy घेऊन.

15 May –

सकाळी लवकरच मुक्काम हालवला. उद्याचा दिवस आमच्यासाठी सर्वात महत्वाचा होता. कारण उद्या आम्ही EBC गाठणार होतो. त्यामुळे आज loboche ला वेळेत पोहचून sufficient विश्रांती घेणे महत्वाच होत. Thukla पर्यंत चढ होता पण gradual होता. सगळे निवांत डकाव डकाव चालत होतो. वातावरण प्रचंड cloudy होत. कधी कधी ढग इतके गर्दी करायचे कि 15-20 फुटावरच दिसण मुश्किल व्हायच. शेजारी Taotse, Lobuche डोंगर, त्यांच्या पायातून वाहणारी नदी, त्याच्या काठावर वसलेलं गाव Feriche स्वप्नवत सुंदर दिसत होत. Thukla ला जेवण करून थोडी रेस्ट घेतली आणि परत चालायला सुरुवात केली. हा चढ चांगलच घामट काढतो. एक एक पाऊल पुढे टाकल कि उंच आणि लांब दिसणारी खिंड अधिक अधिक लांब होत जाते. खुशीच कालपासून चालल होत, snowfall बघायचाय. निम्मा चढ चढल्यावर देवाने तिची इच्छा पूर्ण केली, आणि जोरदार snowfall सुरू झाला. दिवसभराच्या 7-8 तासाच्या चालीनंतर Lobuche ला पोहोचलो.

16 May –

काळ रात्रभर भरपूर पाणी प्यायलो कारण आजच्या EBC च्या strech साठी body hyderate ठेवायची होती. भल्या पहाटे आम्ही Lobuche सोडल. आजचा दिवस परीक्षेचा होता. ‘EBC’ ज्याच्यासाठी केला अट्टाहास. इथून पुढचा सगळा मार्ग glecier च्या कडेकडेने जातो. Gorak shep ला breakfast करून, शिवाजी महाराजांनच्या पुतळ्याला नमस्कार करून EBC कडे कूच केली. आता Mt. Nuptse, Mt. Pumori अगदी हाकेच्या अंतरावरच दिसायला लागले. Gorak shep च मोठ पठार मागे टाकून आम्ही सगळे ridge ला लागलो. Weather ची काही कृपा नव्हती. प्रत्येकजण आपापल्या rhydem मध्ये चालत होता. खुशी आणि सोमा मॅडम बरेच पुढे होते. मी, प्रीती मॅडम, राधिका, शंभू मागून चालत होतो. राधिका खूप थकली होती. तिला एक पाऊलसुद्धा पुढे टाकवत नव्हतं. सगळ्यांना पुढे पाठवलं आणि मी राधिकाबरोबर मागून हळूहळू EBC च्या दिशेने चालायला लागलो. EBC पासून 1/2 तासाच्या अंतरावर असताना राधिका म्हणाली आता बास! खर तर ती सहजासहजी give up करणाऱ्यातली मुलगी नाही. एकदा करायचं म्हणलं कि करायचच असा तिचा attitude. पण ती नाही म्हणल्यावर मी मागे फिरायचा निर्णय घेतला. Winning war is more important than losing many battles. आपल्या क्षमता ओळखण आणि खोट्या अहंकाराला बळी न पडण हेच तर treking मधून शिकायचं असत. ख़ुशी, प्रीती मॅडम, सोमा मॅडम, आणि शंभू EBC वर पोहोचले आणि काळ्या ढगांना खिंडार पाडून सूर्यप्रकाश EBC वर पसरला. एकदम Life of Pie picture ची आठवण झाली. आम्हाला सगळी team गोरक्षेपला साधारण 1-1.30 तासानी जॉइन झाली. खुशीनी पण कमालच केली. सगळ्यात मागे चालणारी ख़ुशी EBC ला सगळ्यांच्या आधी पोचली होती. या खेळात तस पहिल आणि दुसर काही नसत पण तरी. Hot drink पिता पिता राधिकाने second attend चा निर्णय घेतला. Success किंवा failure पेक्षा अशा fighting spirit लाच महत्व असत.

17 May –

सकाळी 5 ला मी, राधिका आणि मिन दाई EBC साठी निघालो. बाकीची team 8 ला Feriche साठी निघणार हाती. Gorekshep च पठार पार करून ridge ला लागलो, साधारण 1.30 तासाच्या चालीनंतर राधिकाला परत त्रास व्हायला लागला, मग मात्र परत मागे फिरलो. Gorekshep ला पोचेपर्यंत बाकीची team तयार झाली होती. खुशी आणि राधिका फार दमल्या मुळे heli नि lukla ला जाण्याचा निर्णय घेतला. Soma मॅम आणि मिन दाई ला पुढे पाठवून मी बाकीच्यां बरोबर heli ची वाट बघत बसलो. साधारण तासा दिडतासानी मे down व्हायला रुर्वत केलि. दोघांना lobuche ला गाठून आम्ही तिघे 1.30 पर्यंत feriche ला पोचलो. एक सुद्धा heli उडाल नसल्यामुळे जॅम tention मधे आलो होतो. 3 ला हेलिकॉप्टर उडायला लागली, वरती ह्यांचा काहीच contact होईना. 8 च्या सुमारास मोमो खात असताना एका porter कडून समजल. की 3 ladies आणि एक नेपाळी मुलगा Thukla वरून खाली उतरत आहेत, लगेचच थोडी बिस्कीट, चॉकलेट्स आणि पाणि घेऊन Thukla ला निघालो. 20 एक मिनिट चालल्या नंतर अंधार तुडवत येणारे राधिका, खुशी, प्रीती मॅम आणि शंभु दिसले आणि जिवात जीव आला. प्रीती मॅम आनंदाच्या एव्हरेस्टवर होत्या. उतारावरून चालण्याची भीती त्यात मिट्ट काळोख त्यात अनोळखी प्रदेश. पण चालायला सुरुवात केल्यावर हे डोंगर हा अंधार ही जमीन फक्त आपल्या साठीच आहे अशी त्यांची भावना झाली आणी त्यामुळे अवघड प्रवासाच रूपांतर सुखद अनुभूतीत झाल.