9422514013 / 9822714667 / 9049948877 info@3pointadventures.com

क्षणभर थांबुन, एक दीर्घ श्वास घेऊन सगळी सर्जनशीलता पणाला लाऊन देवानी अपरांता ची निर्मिती केली असावी. निबिड अरण्य, दुर्गम घाटवाटा, अथांग अपार समुद्र, भाजुन काढणारा उन्हाळा आणि शत्रूवर तुटून पडणाऱ्या जातिवंत योध्या सारखा बरसणारा पावसाळा आणि ह्या सगळ्यावर कडी म्हणजे इथला कोकणी बाला, लहान मुलाचे सगळे गुण ठासून भरलेला. इथल्या घरां सारखी लोकांची मन सुद्धा सताड उघडी. या बसा, आदरातिथ्य स्वीकार आणि त्यांच्या घरातलेच एक होऊन जा. भवतेक म्हणूनतर शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी कोकणात वसवली. जसा सोन्याच्या कोंदणात हिरा.