9422514013 / 9822714667 / 9049948877 info@3pointadventures.com

सोमवार 25 तारखेला ढवळ्या ते आर्थर सिट ट्रेक च्या पुर्वपाहणी च्या निमित्ताने मि, बिल्वा आणि चेतन गेलो होतो. हा बिल्वाचा पहिलाच jungle trek होता. आयुष्यात प्रथमच घनदाट जंगल काय असत ते अनुभवायला मिळणार होत.

कुंभळजाई मन्दिरापाशी गाडी लावुन जोर गावाच्या वरच्या वाडीला आलो. गावकऱ्यां बरोबर रामरामशामशाम zal. वाडीतल्या आजींनी आग्रहान केलेल्या जेवणाच निमंत्रण स्विकारून आमच त्रिकुट गावाची वेस ओलांडुन जंगलात शिरल.

जंगलाचा त्याचा असा असलेला एक प्रकारचा गंध, एअर कंडिशनर च्या थोबाडित मारेल असा गारवा, गर्द हिरवाई , वाऱ्या बरोबर येणारा बकुळेच्या फुलांचा सुगंध, पालापाचोळ्या वरुन चालताना होणारा आवाज आणि ह्या सगळ्यांच्या साथिने चाललेला पक्षांचा किलबिलाट एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेला.
वाटेत येणारा ओढा अनेकदा ओलांडत साधारण तासाच्या चालीनंतर आम्ही पहिला पडाव टाकला. पाणी पिउन, दम खाउन परत चालायला सुरवात केलि, आता जंगल अजुन अजुन गच्च व्ह्यायला लागल. सुर्याची तिरिप सुद्धा जमिनीवर पडायला zadanni जागा ठेवली नव्हती. आपसुकच घ्राणेन्द्रिये तिक्ष्ण zali आणि जंगल वाचायला सुरवात zali. वाटेत दिसलेले केसांचे zubke, विष्ठे मधे असलेले केस जंगल वन्य पशुन्नी समृद्ध असल्याची खुण सांगत होते. दोन तिन तासांच्या चाली नंतर आम्ही घाटातल्या टाक्यां पाशी पोचलो.

आता बिल्वाची नजर चांगलीच तयार zali होती, आम्हि खायला बसलो तिथेच तिला बिबट्याच्या पंजाचे ठसे दिसले. तिच्या साठी हा भितियुक्त excitement असा मिश्र अनुभव होता.

तिथुन दिसणारा चंद्रगड, चंद्रगडा वरुन येणारी पायवाट, समोर दिसणारा प्रतापगड आणि क्षितिजा पर्यन्त पसरलेला सह्याद्रि डोळे भरुन पाहिला. खरतर तिथुन उठावसच वाटत नव्हत, वेळ थांबण कशाला म्हणतात ते अशा ठिकाणी आल्यावर समजत. हेच काही मोजके क्षण कायते आयुष्य असत. घरुन आणलेले भुकलाडु खाउन परतीचा प्रवास सुरु केला.

– सुरेन्द्र जालिहाळ.⁠⁠⁠⁠