9422514013 / 9822714667 / 9049948877 info@3pointadventures.com

१३ Aug २०१७ –

परवा आमचा सुधागड ट्रेक झाला. पावसामुळे वातावरण कुंद होत. ऊन पावसाचा खेळ चांगलाच रंगला होता. एका क्षणाला पाऊस आम्हाला झोडपत होता तर दुसऱ्या क्षणाला ऊन पडत होत. ह्या trek ला आम्ही तेरा जणच होतो, मोठ्यान पेक्षा चिल्लर पार्टीच मोठया प्रमाणात होती. पिल्लू ओजस, आदी पहिल्यांदा आलेला रिआन, खुशी, निहार आणि मिताली. हि पोर किती नशीबवान, इतक्या लहानपणिच ह्यांची भटकंतीला सुरवात झाली. त्यांच्या आई बाबांच पण खुप कौतुक आहे.

तीन तासांच्या पायपिटी नंतर आम्ही गडात प्रवेश केला. सगळ्यांना पहिल्या लागणाऱ्या चिलखती बुरजाच कवतिक दाखवून जेवणा साठी वाडयावर गेलो. आदीनी जाम innocent प्रश्न विचारला, दादा ह्या हॉटेल च नाव काय आहे? प्रश्नच असा होता कि माझ्यातला sense of humor जागा झाला. म्हणालो ‘Hotel पंत सचिव’. जेवताना पंत सचिव, भोर संस्थान ह्या बद्दल मला जी काही थोडीफार माहिती होती ती सांगितली. पोरांच्या प्रश्नांच्या वर्षावा पुढे बाहुबलीच्या बाणांचा वर्षाव कमी पडेल. गडावरच्या अज्जी नि केलेल्या स्वयपाकावर ताव मारून आम्ही महादरवाजा पहायला गेलो. म्हातारीचा चेहरा जाम गोड, जणु कोळ्याने चुकुन तिच्याच चेहऱ्यावर जाळ विणलय. वीरगळीं च्या परिसरात गेलो आणि समोर घनगड आणि तैलबैला दिसले.

लहानमुलांसारखे चौडयावर उभराहून ढगातुन डोक वर काढत होते. कडकडीत वाळलेल्या आम्हाला परत पावसानी भिजवल. महादरवाजा आणि चोर दरवाजा पाहुन आम्ही तडक गड उतरायला सुरवात केली. ओल्या दगडांवरून चालताना दोरीवरून चालल्या सारख तोल सावरत चालाव लागत होत. उतरताना आभाळ चांगलच भरून आल. गर्द हिरवाईच्या जश्या अनेक छटा तश्या grey रंगाच्या पण अनेक छटा पहायला मिळाल्या. वर ढग आणि सुर्या ची कुस्ती चालली होती. दाट ढगांची चादर भेदण्याचा सुर्य प्रयत्न करत होता. अखेर तो जिंकला आणि समोरच्या सरसगडाला त्यांनी आपल्या किरणांनी न्हाऊन काढल. वेळ कधी कोणासाठी थांबत नाही पण कधीतरी
तोपण अशा क्षणी freeze होतो.

आता नुस्त आठवल तरी मन तो क्षण परत जगुन येत.